माहिती संग्रह

नवग्रह उपासना

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील ठराविक कालखंडावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा अंमल असतो. एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी त्या-त्या काळातील किंवा त्या कामाशी संबंधित असणा-या ग्रहाची उपासना, त्या-त्या ग्रहाच्या संख्येइतका जप, दान तसेच रत्नधारण करणे उपयुक्त ठरते. परंतु हे सर्व करताना जाणकार ज्योतिष्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते. विनाकारण व चुकीचे रत्न धारण केल्याने अपेक्षित लाभ तर सोडाच पण संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होते. रत्न धारण करणे आणि नवग्रह उपासना हे एखादे औषध घेण्याप्रमाणे आहे. चुकीचे औषध घेतल्याने जसा उपाय न होता अपाय होण्याचीच शक्यता असते. त्यामुळे उठसूट रत्न धारण करणे, बदलणे किंवा एखाद्या मित्राला एखाद्या रत्नाने लाभ झाला म्हणून आपण पण तेच रत्न धारण करणे असल्या गोष्टी टाळाव्यात.

नवग्रहपीडाहरस्तोत्रं ( श्रीब्रह्मांडपुराणोक्त )

ग्रहाणामादिरादित्यो लोकरक्षणकारकः । विषमस्थानसंभूतां पीडां हरतु मे रविः ॥
रोहिणीशः सुधामूर्तिः सुधागात्रः सुधाशनः। विषमस्थानस्भूतां पीडां हरतु मे विधुः ॥
भूमिपुत्रो महातेजो जगतां भयकृत् सदा । दृष्टीकृद् दृष्टिहर्ता च पीडां हरतु मे कुजः ॥
उत्पातरुपो जगतां चन्द्रपुत्रो महद्युतिः । सूर्यप्रियकरो विद्वान् पीडां हरतु मे बुधः ॥
देवमंत्री विशालाक्षः सदा लोकहिते रतः । अनेकशिष्यसंपूर्णः पीडां हरतु मे गुरुः ॥
दैत्यमंत्री गुरुस्तेषां प्राणदश्च महामतिः । प्रभुस्ताराग्रहाणां च पीडां हरतु मे भृगुः ॥
सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रियः । मन्दचारः प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनिः ॥
महाशिरा महावक्त्रो दीर्घदंष्ट्रो महाबलः । अतनुश्चोर्ध्वशश्च पीडां हरतु मे शिखी ॥
अनेकरुपवर्णैश्च शतशोऽथ सहस्रशः । उत्पातरुपो जगतां पीडां हरतु मे तमः ॥
इति श्रीब्रह्मांडपुराणोक्तं नवग्रहपीडाहरस्तोत्रं संपूर्णम् ।

नवग्रह स्तोत्र (श्री व्यास विरचित)

जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतिम् । तमोरिं सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ॥१॥
दधिशंख तुषाराभं क्षीरोदार्णव संभवम् । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम् ॥२॥
धरणीगर्भ संभूतं विद्युतकांति समप्रभम् । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ॥३॥
प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधं। सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ॥४॥
देवानां च ऋषीणां च गुरुं कांचन सन्निभम्। बुद्धीभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥५॥
हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् । सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥६॥

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् । छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥७॥
अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् । सिंहिकागर्भ संभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ॥८॥
पलाशपुष्प संकाशं तारका ग्रहमस्तकम् । रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ॥९॥
इतिव्यासमुखोद्गीतं यः पठेत् सुसमाहितः । दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यति ॥१०॥
नरनारी नृपाणांच भवेत् दुःस्वप्ननाशनम् । ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् ॥१२॥
ग्रहनक्षत्रजाः पीडास्तस्कराग्निसमुद्भवाः। ताः सर्वाःप्रशमं यान्ति व्यासोब्रूते न संशयः ॥१३॥

इति श्रीव्यास विरचितं आदित्यादिनवग्रहस्तोत्रं संपूर्णम् ॥

सूर्य / रवि : आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सूर्य अथवा रवि ह्या चिन्हाने दर्शवितात. सूर्य हा सिंह राशीचा राशी स्वामी आहे. सूर्य सर्व ग्रहमालेचा केंद्रबिंदू आहे. तो सर्व ग्रहांना स्वतःभोवती फिरत ठेवतो म्हणून तो ग्रहमालेचा राजा आहे. त्याचे गोत्र काश्यप असून कलिंग देशाचा राजा आहे.. त्याचा रंग केशरी असून आरोग्य व सात घोड्यांच्या रथावर तो आरुढ झालेला आहे.
पुराणोक्त मंत्र : जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतिम् । तमोरिं सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ॥
बीज मंत्र : औं -हां -हीं -हौं सः सूर्याय नमः ॥

जप संख्या

धातु

उपधातु

रत्न

धान्य

पशु

रस

वस्त्र

फूल

७ हजार

सुवर्ण (सोने)

ताम्र (तांबे)

माणिक

गहू

लाल गाय

गूळ

केशरी वस्त्र

लाल कमळ

चंद्र : आंतरराष्ट्रीय मानकांनुसार चंद्र ह्या चिन्हाने दर्शवितात. चंद्र हा कर्क राशीचा राशी स्वामी आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्याचे गोत्र अत्रि असून यामुन देशाचा राजा आहे. दहा घोड्यांनी युक्त व तीन चाकी रथावर तो आरुढ झालेला आहे.
पुराणोक्त मंत्र : जपादधिशंख तुषाराभं क्षीरोदार्णव संभवम् । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम् ॥
बीज मंत्र : औं श्रां श्रीं श्रौं सः सोमाय नमः।

जप संख्या

धातु

उपधातु

रत्न

धान्य

पशु

रस

वस्त्र

फूल

११ हजार

सुवर्ण (सोने)

रौप्य (चांदी)

मोती

(Pearl)

तांदूळ

पांढरा बैल

तूप

पांढरे वस्त्र

पांढरे फूल

मंगळ : आंतरराष्ट्रीय मानकांनुसार मंगळ ह्या चिन्हाने दर्शवितात. मंगळ हा मेष व वृश्चिक राशींचा राशी स्वामी आहे. मंगळ हा लढवय्या सेनापती समजला जातो. तो रक्ताचा कारक ग्रह आहे. त्याचे गोत्र भारद्वाज असून अवंती देशाचा राजा आहे. मंगळाचे वाहन मेंढा आहे.
पुराणोक्त मंत्र : धरणीगर्भ संभूतं विद्युतकांति समप्रभम् । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ॥
बीज मंत्र : औं औं क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः।

जप संख्या

धातु

उपधातु

रत्न

धान्य

पशु

रस

वस्त्र

फूल

१० हजार

सुवर्ण (सोने)

ताम्र (तांबे)

प्रवाळ/पोवळे

(Red Coral)

मसुरा

लाल बैल

गूळ

लाल वस्त्र

लाल कमळ

बुध : आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बुध ह्या चिन्हाने दर्शवितात. बुध हा मिथुन व कन्या राशींचा राशी स्वामी आहे. बुध हा वक्तृत्व (संभाषण कला), व्यापार यांचा कारक ग्रह आहे. त्याचे गोत्र अत्रि असून तो मगध देशाचा राजा आहे. सिंह हे बुधाचे वाहन आहे.
पुराणोक्त मंत्र : धरणप्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधं। सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ॥
बीज मंत्र : औं औं ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः।

जप संख्या

धातु

उपधातु

रत्न

धान्य

पशु

रस

वस्त्र

फूल

४ हजार

सुवर्ण (सोने)

कांस्य (कासे)

पाचू

(Emerald)

हिरवे मूग

हत्ती

तूप

निळे वस्त्र

सर्व प्रकारची फुले

गुरु (बृहस्पती) : आंतरराष्ट्रीय मानकांनुसार गुरु ह्या चिन्हाने दर्शवितात. बुध हा मिथुन व कन्या राशींचा राशी स्वामी आहे. बुध हा वक्तृत्व (संभाषण कला), व्यापार यांचा कारक ग्रह आहे. त्याचे गोत्र अत्रि असून तो मगध देशाचा राजा आहे. सिंह हे बुधाचे वाहन आहे.
पुराणोक्त मंत्र : देवानां च ऋषीणां च गुरुं कांचनसन्निभम्। बुद्धीभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥
बीज मंत्र : औं ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः।

जप संख्या

धातु

उपधातु

रत्न

धान्य

पशु

रस

वस्त्र

फूल

१९ हजार

सुवर्ण (सोने)

कांस्य (कासे)

पुष्कराज

(Yellow Sapphire)

हरबरा डाळ

अश्व (घोडा)

साखर

पिवळे वस्त्र

पिवळी फुले

शुक्र : आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शुक्र ह्या चिन्हाने दर्शवितात. शुक्र हा वृषभ व तूळ राशींचा राशी स्वामी आहे. शुक्र हा वैवाहिक जीवन व प्रेमाचा कारक ग्रह आहे. त्याचे गोत्र भार्गव असून तो भोजकट देशाचा राजा आहे.
पुराणोक्त मंत्र : हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् । सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥
बीज मंत्र : औं द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः।

जप संख्या

धातु

उपधातु

रत्न

धान्य

पशु

रस

वस्त्र

फूल

१६ हजार

सुवर्ण (सोने)

रौप्य (चांदी)

हिरा


(Diamond)

तांदूळ

पांढरा घोडा

तूप

रंगीत वस्त्र

पांढरी फुले

शनि : आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शनि ह्या चिन्हाने दर्शवितात. शुक्र हशनि हा मकर व कुंभ राशींचा राशी स्वामी आहे. त्याचे गोत्र कश्यप असून तो सौराष्ट्र देशाचा राजा आहे. शनिच्या साडेसातीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये शनिबद्दल जरा भिती निर्माण झालेली आढळते. परंतु साडेसातीकडे जरा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिल्यास हा परीक्षेचा काळ असतो. ह्या काळात तावून सुलाखून निघाल्यानंतर पुढील काळ भरभराटीचा जातो. साडेसातीच्या काळात नवीन व्यवसाय सुरु करणे, नवीन रत्न धारण करणे इत्यादि कामे जरा विचारपूर्वक करावीत.
पुराणोक्त मंत्र : नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् । छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥
बीज मंत्र :औं प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।

जप संख्या

धातु

उपधातु

रत्न

धान्य

पशु

रस

वस्त्र

फूल

२३ हजार

सुवर्ण (सोने)

लोह (लोखंड)

नीलम

Blue Sapphire

उडीद

म्हैस

तेल

काळे वस्त्र

काळी फुले

राहू: आंतरराष्ट्रीय मानकांनुसार राहू ह्या चिन्हाने दर्शवितात. त्याचे गोत्र पैठनस असून तो राठिनापूर देशाचा राजा आहे.
पुराणोक्त मंत्र : अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् । सिंहिकागर्भ संभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ॥
बीज मंत्र :औं भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः।

जप संख्या

धातु

उपधातु

रत्न

धान्य

पशु

रस

वस्त्र

फूल

१८ हजार

सुवर्ण (सोने)

शिसे (Lead)

गोमेद

(Hessonite Garnet)

तीळ

घोडा

तेल

निळे वस्त्र

 काळी फुले

केतू : आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केतू ह्या चिन्हाने दर्शवितात. त्याचे गोत्र जैमिनस असून तो अंतर्वेदी देशाचा राजा आहे.
पुराणोक्त मंत्र : पलाशपुष्प संकाशं तारका ग्रहमस्तकम् । रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ॥
बीज मंत्र :औं स्रां स्रीं स्रौं सः केतवे नमः।

जप संख्या

धातु

उपधातु

रत्न

धान्य

पशु

रस

वस्त्र

फूल

१७ हजार

सुवर्ण (सोने)

पोलाद
(Steel)

वैडूर्य (लसण्या)

Cat's Eye

तीळ

बोकड

तेल

काळे वस्त्र

धुरकट रंगाची फुले