विविध पूजा / विधी

अभिषेक

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विविध देवतांना विविध सूक्त, स्तोत्रे म्हणत स्नान म्हणजेच अभिषेक करणे हे मोठे पुण्यदायी व इच्छित मनोकामना पूर्ण करणारे कर्म म्हणून सांगितले गेले आहे. काही जणांकडे घरातील देवांना वर्षातील ठराविक दिवशी अभिषेक करण्याची प्रथा असते. तसेच दर चतुर्थीस गणपतीला, सोमवारी शंकराला, मंगळवार/शुक्रवार अथवा पौर्णिमेस देवीला, गुरुवारी दत्ताला, शनिवारी मारुतीला, रविवारी/ बुधवारी विष्णूला, रविवारी खंडोबाला अभिषेक करणे विशेष पुण्यकारक समजले जाते.

देवता

सूक्ते किंवा स्तोत्र

गणपती

ब्रह्मणस्पती सूक्त, गणपती सूक्त, अथर्वशीर्ष, संकटनाशन स्तोत्र इ.
सहस्रावर्तने - अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्राच्या १००० आवर्तनांनी अभिषेक

देवी

श्री सूक्त, शिवमहिम्न स्तोत्र इ.

शंकर

रुद्र , शिवमहिम्न स्तोत्र इ.
एकादशिनी- ११ आवर्तने
लघुरुद्र- ११ एकादशिनी (१२१ आवर्तने)
महारुद्र- ११ लघुरुद्र (१३३१ आवर्तने)
अतिरुद्र- ११ महारुद्र (१४६४१ आवर्तने)

विष्णू

पुरुषसूक्त, पवमान इ.

मारुती

रुद्र, शिवमहिम्न स्तोत्र इ.

अभिषेकाच्या साहित्याची साधारण यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)

हळद, कुंकु, गुलाल, बुक्का

हार, फुले

गूळ खोबरे

समई, नीरांजन

सुपाऱ्या १०

विड्याची पाने २५

तांदूळ १ वाटी

देव पुसण्याचे वस्त्र

हळकुंडे ५

बेल ,दूर्वा

सुट्टे पैसे १० नाणी

नवीन वस्त्र

खारका ५

फळे ५

अत्तर

जानवीजोड

बदाम ५

कापूर

उदबत्ती

पाट/ आसने

नारळ २

तेल, तूप

तेलवाती, फुलवाती

ताटे २, वाट्या ६

पळी, भांडे, तांब्या,ताम्हण, अभिषेक पात्र इ.

पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर )

देवीचा अभिषेक असल्यास : ओटीचे सामान , गहू १ वाटी, ब्लाऊजपीस

अभिषेक विषयी माहिती डाऊनलोड करा